Slide Two

स्वागत आहे

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची

बाल विकास मंदिर, सासवड

Slide Two
previous arrow
next arrow

म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवड

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गसुंदर पुरंदर तालुक्यातील नावाजलेली उपक्रमशील शाळा म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना ११ जून १९८६ साली झाली. सन २०१०-११ हे रौप्यमहोत्सवी वर्ष, या वर्षांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले. ११ जून १९८६ ते आजपर्यंत शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय प्रगतीचा आढावा थोडक्यात घेत आहे . बदलत्या काळानुरूप शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना केली…..

अधिक वाचा →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

mes founders

आमच्याबद्दल

म.ए.सो बद्दल
१८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा …
अधिक वाचा →
principle Badadheमुख्याध्यापकीय मनोगत
म.ए.सो.बाल विकास मंदिर, सासवड ही आपली शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. उत्तम गुणवत्ता व दर्जा असणारी तसेच सर्वाधिक पटसंख्या असणारी आपली शाळा आहे…..
अधिक वाचा →
School Featuresशाखेची वैशिष्ट्ये
उपक्रमशील शाळा, भव्य क्रीडांगण, प्रशिक्षित शिक्षक वृंद, सेमी इंग्रजी वर्ग, बाह्य परीक्षांना वाव, शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रेसर निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना …
अधिक वाचा →
शैक्षणिक व सामाजिक उपक्रमशैक्षणिक व सामाजिक उपक्रम
बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी निमित्त ‘ पावनखिंड दौड ‘, जमीन जुमला कायद्यात बसवा – ॲड. नेवसे यांचे म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन, गणेश उत्सव निमित्त ….
अधिक वाचा →
शालेय उपक्रमशालेय उपक्रम
पालखी सोहळा २०२५, गुरुपौर्णिमा उत्सव, दीपपूजन, क्रांतिसप्ताह,म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेत ‘ बाल दहीहंडी ‘, म.ए.सो. पूर्व प्राथमिक ( बालवाडी ) च्या विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक गणपती मूर्ती ….
अधिक वाचा →

बातम्या आणि अद्यतने

लेटेस्ट उपक्रम

म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत नवागतांचे स्वागत

म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत नवागतांचे स्वागत

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवडचे उल्लेखनीय यश

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवडचे उल्लेखनीय यश

म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत बालदिंडीचे आयोजन

म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत बालदिंडीचे आयोजन

पावनखिंड दौड शाळेत व्याख्यान

पावनखिंड दौड शाळेत व्याख्यान

बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी निमित्त ‘ पावनखिंड दौड ‘ दि.१२-७-२०२५

बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी निमित्त ‘ पावनखिंड दौड ‘ दि.१२-७-२०२५

श्री.अजय गणेशोत्सव मंडळ सासवड यांचेकडून शाळेचा सन्मान २०२५

श्री.अजय गणेशोत्सव मंडळ सासवड यांचेकडून शाळेचा सन्मान २०२५

जमीन जुमला कायद्यात बसवा – ॲड. नेवसे यांचे म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन

जमीन जुमला कायद्यात बसवा – ॲड. नेवसे यांचे म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन

बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

फोटो गॅलरी

म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत बालदिंडीचे आयोजन

म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत बालदिंडीचे आयोजन

सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव मा.श्री.सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे, वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. शाळेच्या परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत शाळेतील सर्व विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे, श्री.नरेंद्र महाजन, श्री.दिपक कांदळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सौ.मंजुषा चोरामले, सौ.साधना राऊत व श्रीम.अमृता जगताप यांनी आरतीचे गायन केली. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. तसेच सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात टाळ, भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीची रोपे असल्याने दिंडीला खऱ्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले.या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा‘ , ‘ पाणी आडवा, पाणी जिरवाअसा संदेश दिला.”ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा, पालखी तयार करणे, अभंग गायन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सौ.स्वाती बोरावके यांनी आषाढी एकादशी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.अमृता जगताप यांनी केले.

बातमीची लिंक – https://bapumulik1212.blogspot.com/2026/07/blog-post_22.html


This will close in 20 seconds

Scroll to Top